संपूर्ण बॅट एकाच लाकडापासून का बनवलेली नसते? त्यात अजून काय वापरतात? जाणून घ्या कारण...

Mansi Khambe

फलंदाजी

तुमचा आवडता फलंदाज ज्या बॅटने फलंदाजी करतो, ती कशी बनवली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? क्रिकेट बॅट दिसायला एक साधी लाकडी बॅट वाटू शकते.

Cricket bat manufacturing

|

ESakal

भौतिकशास्त्र

पण तिच्यामागे आश्चर्यकारक अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र दडलेले आहे. खेळाडूंच्या बॅट्स दोन भागांपासून बनवलेल्या असतात. संपूर्ण बॅट लाकडाच्या एकाच तुकड्यापासून का बनलेली नसते?

Cricket bat manufacturing

|

ESakal

बॅट

खेळाडूंच्या बॅट एकाच लाकडाच्या दोन तुकड्यांपासून बनवल्या जातात. खालचा भाग लाकडाच्या एका तुकड्यापासून बनवलेला असतो तर वरचा दांडा दुसऱ्या तुकड्यापासून बनवून एकत्र जोडलेला असतो.

Cricket bat manufacturing

|

ESakal

क्रिकेट

यामागील सिद्धांत ताशी १५० किलोमीटर वेगाच्या चेंडूशी जोडला जातो. क्रिकेटमध्ये चेंडूचा वेग ताशी १४० ते १५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शक

Cricket bat manufacturing

|

ESakal

कंपन

जेव्हा इतका वेगवान चेंडू बॅटला आदळतो तेव्हा प्रचंड ऊर्जा आणि कंपन निर्माण होते. जर संपूर्ण बॅट लाकडाची बनलेली असती तर संपूर्ण धक्का थेट फलंदाजाच्या हातांवर पोहोचला असता.

Cricket bat manufacturing

|

ESakal

दुखापत

ज्यामुळे हात, मनगट आणि दंडांना दुखापत होऊ शकते. बॅटचे पाते सामान्यतः इंग्लिश विलो किंवा काश्मिरी विलोच्या लाकडापासून बनवलेले असते.

Cricket bat manufacturing

|

ESakal

चेंडूचा आघात

कारण ते चेंडूचा आघात अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते. हँडलसाठी वेत नावाचे एक विशेष लाकूड वापरले जाते. हे लाकूड अत्यंत लवचिक असून स्प्रिंगप्रमाणे काम करते.

Cricket bat manufacturing

|

ESakal

वेताचा भाग

जेव्हा चेंडू बॅटला आदळतो, तेव्हा हँडलचा वेताचा भाग आघाताचा बराचसा भाग शोषून घेतो. यामुळे फलंदाजाला कमी कंपने जाणवतात ज्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो.

Cricket bat manufacturing

|

ESakal

व्ही आकार

बॅट बनवताना ब्लेडच्या वरच्या भागात 'व्ही' आकाराचा काप दिला जातो. ज्याला 'स्प्लाइस' म्हणतात. हँडल याच भागात बसवले जाते. ही रचना केवळ जोडण्यासाठी नाही, तर त्यामागे एक शास्त्र आहे.

Cricket bat manufacturing

|

ESakal

प्रतिबंध

'व्ही' आकाराचा सांधा, चेंडू बॅटला आदळल्यावर निर्माण होणारा दाब संपूर्ण बॅटमध्ये समान रीतीने वितरीत करतो. यामुळे कोणत्याही एका भागावर अतिरिक्त दाब पडण्यास प्रतिबंध होतो.

Cricket bat manufacturing

|

ESakal

वजन

ज्यामुळे बॅट लवकर तुटण्यापासून वाचते. याउलट, जर संपूर्ण बॅट लाकडाच्या एकाच तुकड्यापासून बनवली असती, तर तिचे वजन आणि संतुलन बिघडू शकले असते.

Cricket bat manufacturing

|

ESakal

फटके

वेगळे हँडल वापरल्यामुळे बॅटचे वजन योग्य ठिकाणी केंद्रित राहते. यामुळेच फलंदाज सहजपणे बॅट फिरवू शकतात आणि मोठे फटके मारू शकतात.

Cricket bat manufacturing

|

ESakal

पाते

बॅटचे पाते पूर्णपणे लाकडी आणि मूठ प्रामुख्याने वेत आणि लाकडापासून बनवलेली असणे आवश्यक आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ॲल्युमिनियम, स्टील किंवा इतर धातूंपासून बनवलेल्या बॅट्सना परवानगी नाही.

Cricket bat manufacturing

|

ESakal

तोंडात ४००० तीक्ष्ण दात असूनही मगर शिकार अख्खीच्या अख्खी का गिळते? जाणून घ्या कारण...

Crocodile teeth facts

|

ESakal

येथे क्लिक करा