Sandip Kapde
जेसीबी हे प्रत्यक्षात मशीनचं नव्हे तर कंपनीचं नाव आहे.
या कंपनीचे बॅकहो लोडर मशीन बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
जेसीबीचा रंग पिवळा का असतो याची माहिती फार थोड्या लोकांना असते.
सुरुवातीला जेसीबी मशीन निळ्या आणि लाल रंगात बनवले गेले होते.
नंतर कंपनीने त्याचा रंग पिवळा करायचा निर्णय घेतला.
पिवळा रंग लांबून सहज ओळखता येतो म्हणून हा बदल करण्यात आला.
अंधार, धुके, धुळीतही पिवळा रंग स्पष्ट दिसतो.
कंस्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा रंग निवडण्यात आला.
बॅकहो लोडर ही मशीन खोदकामासाठी व अवजड सामान उचलण्यासाठी वापरली जाते.
आज सर्वसामान्य लोक बॅकहो लोडरला ‘जेसीबी’ म्हणूनच ओळखतात.
जेसीबी कंपनी अनेक प्रकारची अवजड यंत्रे तयार करते.
यंत्राची अधिक चांगली व्हिजिबिलिटी मिळावी म्हणून पिवळा रंग वापरला जातो.
बांधकामाच्या ठिकाणी पिवळ्या हेल्मेटचा वापर सुद्धा याच कारणामुळे केला जातो.
जेसीबीसारख्या यंत्रांची ओळख रंगावरूनही केली जाते.
जेसीबी मशीनचा रंग बदलण्यामागे सुरक्षिततेचा आणि दृश्यतेचा महत्त्वाचा विचार आहे.