रेल्वे स्टेशनवर मोठे लोखंडी बॉक्स का ठेवले जातात? या बॉक्समध्ये काय असतं?

Mansi Khambe

लोखंडी बॉक्स

तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेकदा मोठे लोखंडी बॉक्स पडलेले दिसतात. काही स्टेशनवर, अशा बॉक्सच्या रांगा लागलेल्या असतात, ज्यावर रेल्वेशी संबंधित माहिती लिहिलेली असते.

Railway Station Line Box

|

ESakal

प्रश्न

पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की या बॉक्समध्ये काय असते? ते कोणाचे आहेत आणि ते प्लॅटफॉर्मवर का ठेवलेले असतात?

Railway Station Line Box

|

ESakal

लाइन बॉक्स

रेल्वेच्या भाषेत या बॉक्सना 'लाइन बॉक्स' म्हणतात. ते ट्रेनच्या लोको पायलट, म्हणजेच ड्रायव्हर आणि गार्ड यांचे असतात. हे बॉक्स ट्रेन चालवणाऱ्या आणि सुरक्षित रेल्वे वाहतूक सुनिश्चित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा एक भाग आहेत.

Railway Station Line Box

|

ESakal

बॉक्समध्ये काय आहे?

लाईन बॉक्समध्ये टॉर्च, झेंडे, डेटोनेटर्स आणि प्रवासादरम्यान लागणारी इतर आवश्यक साधने असतात. या सर्व वस्तू रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विविध परिस्थितीत उपयुक्त ठरतात.

Railway Station Line Box

|

ESakal

अत्यावश्यक वस्तू

रेल्वेमध्ये पूर्वी लोको पायलट म्हणून काम केलेल्या कुमारप्रीतच्या मते, या सर्व वस्तू रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विविध परिस्थितीत उपयुक्त ठरतात. त्यामुळे, त्यांच्या कर्तव्यासाठी या वस्तू अत्यावश्यक मानल्या जातात.

Railway Station Line Box

|

ESakal

कारण

याबाबत एका टीटीईंनी अशी माहिती दिली की, हे बॉक्स प्लॅटफॉर्मवर ठेवण्याचे कारण देखील त्यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे.

Railway Station Line Box

|

ESakal

कर्तव्य

ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी, कर्मचारी आपला लाईन बॉक्स सोबत घेतात आणि आपले कर्तव्य पूर्ण झाल्यावर तो निर्धारित ठिकाणी जमा करतात.

Railway Station Line Box

|

ESakal

कामाचा भाग

म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला स्टेशनवर अशी पेटी दिसेल, तेव्हा समजून घ्या की ती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळापत्रकाचा एक भाग आहे.

Railway Station Line Box

|

ESakal

सलमान-शाहरुखच्या घराजवळ वसलंय मिनी गोवा, भन्नाट लोकेशन!

Mumbai Mini Goa

|

ESakal

येथे क्लिक करा