सकाळ डिजिटल टीम
श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपीस का असतो या मागचे रहस्य काय आहे तुम्हाला माहित आहे का?
श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपीस का असतो या मागचे मुख्य कारण जाणून घ्या.
असे म्हंटले जाते की श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपीस असण्यामागे अनेक कथा आणि मान्यता आहेत.
एका कथेनुसार, कृष्ण आणि राधा जेव्हा नृत्य करत होते, तेव्हा जमिनीवर पडलेले मोरपंख कृष्णाने आपल्या मुकुटात धारण केले. राधाने विचारले असता, कृष्णाने सांगितले की या पंखांमध्ये तिला तिचे प्रेम दिसते.
मोर हे कृष्णाचे आवडते पक्षी होते आणि त्याचे पंख त्याच्या निसर्गावरील प्रेमाचे प्रतीक आहे असे म्हंटले जाते.
मोर आणि साप एकमेकांचे शत्रू असले तरी, कृष्णाने आपल्या मुकुटात मोरपीस ठेवून शत्रूंनाही सन्मान देण्याची शिकवण दिली अलस्याची माण्यता आहे.
कृष्णाला कालसर्प दोष होता आणि मोरपीस त्याच्यावरील नकारात्मक प्रभावापासून वाचवते. अशी माण्यता आहे.
एका कथेनुसार, एका मोराने कृष्णाला नृत्य शिकवल्याबद्दल मोरपीस गुरुदक्षिणा म्हणून दिली होती, आणि कृष्णाने ते पंख आपल्या मुकुटात धारण केले. असे म्हंटले जाते.
मोरपीस कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शिकवणीचा एक अविभाज्य भाग आहे. प्रेम, निसर्गावरील प्रेम, आणि न्यायाचे प्रतीक अल्याचे म्हंटले जाते.