Anushka Tapshalkar
लाहोर हे पाकिस्तानमधील दुसरं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या शहराचा संबंध भगवान रामाशी आहे?
रामायणानुसार, भगवान रामाचे दोन पुत्र होते – लव आणि कुश. त्यांच्याशी लाहोर आणि कुसूर या दोन शहरांचा संबंध आहे.
हिंदू मान्यतेनुसार लाहोरचं प्राचीन नाव "लवपुरी" किंवा "लवपुर" होतं. हे शहर रामपुत्र लवने वसवलं होतं.
रामाच्या वानप्रस्थात जाण्याआधी लवला पंजाब प्रदेश आणि कुशला अयोध्या व दक्षिण कोसलचं राज्य देण्यात आलं.
1947 पूर्वी लाहोर भारताच्या पंजाब प्रांतात होतं. फाळणीनंतर ते पाकिस्तानमध्ये गेलं, पण अनेक भारतीयांचं या शहराशी नातं अजूनही आहे.
लाहोर किल्ल्यात लवच्या नावाचं एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर शीख साम्राज्याच्या काळात बांधण्यात आलं.
लाहोरमध्ये संस्कृत ग्रंथांचं प्रकाशन होतं. प्रसिद्ध प्रकाशनगृह 'मोतीलाल बनारसीदास' याची स्थापना याच शहरात झाली होती.
हिंदू, शीख, मुगल, पठाण आणि आर्य समाज – लाहोर हे अनेक संस्कृतींचं संगमस्थान राहिलं आहे.
हे लक्षात घ्या की, वाल्मिकी रामायणात लवने लाहोर वसवल्याचा स्पष्ट उल्लेख नाही, परंतु लोककथा आणि परंपरेत ही गोष्ट मानली जाते.
लाहोरचं हिंदू कनेक्शन हे इतिहास, संस्कृती आणि श्रद्धेच्या अनोख्या संगमाचं उदाहरण आहे.