सकाळ डिजिटल टीम
श्रावण महिण्यात महादेवाच्या उपासनेला विषेश महत्त्व का दिले जाते. काय आहेत या मागची कारणे जाणून घ्या.
समुद्रमंथनातून 'हलाहल' नावाचे विष बाहेर पडले, ज्यामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याची भीती होती. त्यावेळी भगवान शंकराने हे विष प्राशन केले आणि जगाला वाचवले. हे विष त्यांनी आपल्या घशात धरले, ज्यामुळे त्यांचा घसा नीळकंठ झाला. ही घटना श्रावण महिन्यात घडली असे मानले जाते, म्हणून या महिन्यात शंकराची पूजा करून त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशी माण्यता आहे.
असे मानले जाते की, देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपस्या केली होती. या तपस्येने शंकर प्रसन्न झाले आणि तिची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे अविवाहित मुली श्रावणी सोमवारी व्रत ठेवून इच्छित वर मिळण्यासाठी शंकराची उपासना करतात.
श्रावण महिन्यात शिवाचे तत्त्व अधिक प्रभावी असते, असे मानले जाते. या काळात वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि दैवी स्पंदने जास्त असल्याने शिवाची उपासना केल्याने त्याचे अधिक चांगले परिणाम मिळतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात शिवाची उपासना केल्याने राहू-केतू, शनी यांसारख्या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि ग्रह दोषांचे निवारण होते. यामुळे भक्तांना शारीरिक आणि मानसिक शांती मिळते.
श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. भक्त आपल्या विविध इच्छांसाठी, जसे की उत्तम आरोग्य, धन-संपत्ती, सुखी वैवाहिक जीवन आणि मोक्ष प्राप्तीसाठी शिवाची आराधना करतात.
श्रावण महिना हा पावसाळ्याचा असतो. पावसाने निसर्गात नवचैतन्य येते आणि सर्वत्र हिरवळ पसरते. ही हिरवळ आणि थंड वातावरण शिवाला प्रिय आहे असे मानले जाते. शिवाला जलाभिषेक करणे हे निसर्गाशी आणि पावसाशी असलेल्या त्यांच्या संबंधाचे प्रतीक मानले जाते.
श्रावण महिन्यात शिवाची उपासना केल्याने आध्यात्मिक वाढ होते आणि मनाला शांती मिळते. ध्यान, जप आणि पूजेमुळे मन एकाग्र होते आणि नकारात्मक विचार दूर होतात.
या महिन्यात वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारलेले असते, ज्यामुळे पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यांना अधिक महत्त्व प्राप्त होते. मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी होते आणि 'ओम नमः शिवाय' च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय होतो