सकाळ डिजिटल टीम
कमळ या फूलाला भारताचं राष्ट्रीय फूल म्हणून का ओळखले जाते तुम्हाला माहित आहे का?
कमळ या फूलाला भारताच्या राष्ट्रीय फूलाचा दर्जा का देण्यात आला आहे या मागची कारणं जाणून घ्या.
कमळ हे भारतीय संस्कृतीत पवित्र फूल मानले जाते. ते सौंदर्य, प्रजनन क्षमता आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
कमळाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. देवी लक्ष्मी, सरस्वती आणि इतर देवतांशी त्याचे नाते आसल्याची मान्यता आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये कमळाचा उल्लेख आढळतो.
कमळ हे भारतीय संस्कृतीत धैर्य, दृढनिश्चय आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते.
कमळाचे फूल भारतातील नैसर्गिक सौंदर्याचे आणि समृद्ध परंपरेचे प्रतिनिधित्व करते.
कमळाचे फूल भारतातील विविध भागांमध्ये सहज उपलब्ध आहे. ते भारतीय संस्कृती आणि परंपरेशी खोलवर जोडलेले आहे.
भारताचे राष्ट्रीय फूल कमळ (Lotus) आहे. याची निवड अनेक कारणांमुळे झाली असल्याचे म्हंटले जाते.
कमळ हे भारताव्यतिरिक्त व्हिएतनामचे राष्ट्रीय फूल आहे. कमळाची फुले इजिप्तमध्ये शुभ मानली जातात कारण ते सूर्यदेवाचे प्रतीक आहेत.