Shubham Banubakode
सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाच्या मधल्या वेळेत आपण जेवतो, त्याला लंच म्हणतात. म्हणजेच आपलं दुपारचं जेवण.
History of Food Words
esakal
'लंच' हा शब्द 'लंचियन' (Luncheon) या शब्दापासून तयार झाला. १७व्या शतकात या शब्दाचा वापर हलक्या जेवणासाठी केला जात होता.
History of Food Words
esakal
'लंचियन' या शब्दाचा वापर पूर्वी ब्रेड किंवा चीजच्या मोठ्या तुकड्यासाठीही केला जायचा. मात्र, त्याचा नेमका उगम स्पष्ट नाही.
History of Food Words
esakal
डिनर म्हणजे केवळ रात्रीचं जेवण नाही. दिवसभरातील मुख्य जेवणाला डिनर म्हणतात. काही ठिकाणी हे जेवण दुपारीही केलं जातं.
History of Food Words
esakal
'डिनर' हा शब्द जुन्या फ्रेंच भाषेतील 'डिस्नर'पासून आला. त्याचा संबंध लॅटिन भाषेतील उपवास सोडून खाण्याच्या अर्थाच्या शब्दाशी जोडला जातो.
History of Food Words
esakal
आज आपण रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतो. पण पूर्वी युरोपमध्ये दिवसातील मुख्य जेवण सकाळी किंवा दुपारच्या सुमारास घेतलं जायचं.
History of Food Words
esakal
काळानुसार युरोपमध्ये लोकांच्या जेवणाच्या वेळा बदलल्या. विशेषतः उच्चभ्रू वर्गात मुख्य जेवण उशिरा घेण्याची पद्धत वाढली आणि डिनर संध्याकाळी होऊ लागलं.
History of Food Words
esakal
ब्रिटनमधील काही भागांत दुपारच्या मुख्य जेवणाला डिनर म्हणतात. तर संध्याकाळच्या जेवणासाठी 'टी' हा शब्द वापरला जातो.
History of Food Words
esakal
Why Is Salt Given to Cows and Buffaloes
esakal