Monika Shinde
यंदा ३ जानेवारी पौर्णिमा ते १५ फेब्रुवारी २०२६ शिवरात्री दरम्यान, एकूण ४४ दिवसांचा हा माघ मेळा प्रयागराजमध्ये आयोजित केला आहे.
Magh Mela in Prayagraj
Esakal
माघ मेळा म्हणजे श्रद्धा, साधना आणि आध्यात्मिक शक्तींचा संगम. दरवर्षी लाखो भाविक माघ महिन्यात प्रयागराजच्या पवित्र संगमावर स्नानासाठी येतात.
Magh Mela in Prayagraj
Esakal
अनेकांना प्रश्न पडतो की माघ मेळा फक्त प्रयागराजमध्येच का भरतो? हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकसारख्या पवित्र स्थळांवर का नाही?
Magh Mela in Prayagraj
Esakal
पौराणिक कथांनुसार पृथ्वीवरील पहिला अश्वमेध यज्ञ ब्रह्मदेवांनी प्रयागराज येथे केला. त्यामुळे प्रयागराजला सर्व यज्ञांचे प्रमुख केंद्र मानले जाते.
Magh Mela in Prayagraj
Esakal
‘प्रयाग’ म्हणजे यज्ञांचा संगम. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमामुळे हे स्थान आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
Magh Mela in Prayagraj
Esakal
समुद्रमंथनावेळी अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले होते. प्रयागराज हे त्यापैकी एक स्थान असल्याची धार्मिक मान्यता आहे.
Magh Mela in Prayagraj
Esakal
माघ महिन्यात प्रयागराजच्या संगमातील पाणी अमृततुल्य होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या काळातील स्नानाला विशेष पुण्यफळ मिळते.
Magh Mela in Prayagraj
Esakal
माघ मेळ्याच्या काळात भाविक संगमाजवळ राहून संयमित जीवन जगतात. या परंपरेला ‘कल्पवास’ म्हणतात, जी आत्मशुद्धीसाठी महत्त्वाची आहे.
Magh Mela in Prayagraj
Esakal
म्हणूनच हजारो वर्षांपासून माघ मेळ्याची परंपरा फक्त प्रयागराजमध्येच सुरू आहे आणि आजही तो श्रद्धेचा महान उत्सव मानला जातो.
Magh Mela in Prayagraj
Esakal