दिवाळीत किल्ले बांधण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली?

संतोष कानडे

दिवाळी

महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात मातीचे किल्ले उभारण्याची जुनी परंपरा आहे.

निनाद बेडेकर

इतिहासकार निनाद बेडेकर यांनी ही परंपरा सुमारे ३०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले आहे.

परंपरा

ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडली जाते.

इतिहास

शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा यामागचा महत्त्वाचा उद्देश मानला जातो.

मातीचे किल्ले

काही ऐतिहासिक कथांनुसार, शिवराय लहानपणी मातीचे किल्ले तयार करत असत.

गडांची रचना

या किल्ल्यांच्या प्रतिकृतींमधून मुलांना गडांची रचना आणि त्यांचे महत्त्व समजण्यास मदत होते.

रायगड

रायगड, राजगड, सिंहगड आणि प्रतापगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती आवडीने बनवल्या जातात.

झाडांच्या फांद्या

पूर्वी दगड, माती, विटा आणि झाडांच्या फांद्यांचा वापर करून हे किल्ले तयार केले जात असत.

स्पर्धा

आजही अनेक ठिकाणी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन किल्ले उभारतात आणि किल्ले बांधणीच्या स्पर्धाही आयोजित करतात.

मुघलांच्या शयनकक्षात असायच्या 'या' खास वस्तू

<strong>येथे क्लिक करा</strong>