दसऱ्याला झेंडूची फुलं सर्वाधिक का वापरले जातात?

Pranali Kodre

साडेतीन मुहूर्तांपैकी एक

दसरा भारतातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवसाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

विजयादशमी

दसऱ्याला विजयादशमी असही म्हटलं जात असल्याने हा दिवस विजयाचा उत्सव साजरा करण्याचा दिवसही समजला जातो.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

झेंडूची फुलं

महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी झेंडूंच्या फुलांचा सर्वाधिक वापर केला जातो. तोरणं, हार किंवा देवांना वाहण्यासाठी सगळीकडेच झेंडूच्या फुलांचा वापर होतो.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

झेंडूला इतकं महत्त्व का?

पण झेंडू या फुलाला दसऱ्याच्या दिवशी इतकं महत्त्व का दिलं जातं, यामागे काही कारणं आहेत. त्याचा आढावा घेऊ.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

सहज उपलब्धता

महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर दसऱ्याच्या कालावधीत झेंडू चांगला फुलतो आणि त्यामुळे झेंडूचे फूल हे सहज उपलब्ध असते आणि सर्वांना सहज मिळू शकते. याशिवाय दोन दिवस तरी किमान सहज टिकते.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

शुभ रंग

याशिवाय झेंडूची फुलं पिवळ्या, केशरी अन् सोनेरी रंगातील असतात, हे रंग शुभ मानले जातात. याशिवाय विजयाचे आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतात.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

ऊर्जा आणि सुंदरतेचेही प्रतीक

तसेच झेंडूचे फुल हे ऊर्जा आणि सुंदरतेचेही प्रतीक असल्याचे काही प्राचीन ग्रंथांत सांगण्यात आले आहेत. तसेच हे फूल सूर्याचेही प्रतीक समजले जाते.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

हिरण्यगर्भ पुष्प

झेंडूचे फुल हे हिरण्यगर्भ पुष्प म्हणूनही ओळखले जाते. हिरण्यचा अर्थ सोनं असा होतो. त्यामुळे सोन्याचा दिवस म्हणजेच दसऱ्याला ते वापरलं जाते.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

नकारात्मकता होते दूर

संस्कृतमध्ये स्थूल पुष्प म्हणून ओळखले जाणारे झेंडूचे फूल सत्याचे आणि देवाप्रती समर्पणाचेही प्रतीक असून त्याच्या सुगंधाने नकारात्मकता दूर होते, असं समजलं जाते.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

औषधी गुणधर्म

झेंडूच्या फुलांमध्ये औषधी गुणधर्मही आहेत असून त्याचा वापर त्वचा रोग आणि मुत्रविकारासाठी होऊ शकतो.

Significance of Marigold in Dussehra

|

Sakal

भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

India's Largest Coffee Producing State : Karnataka

|

Sakal

येथे क्लिक करा