लिफ्टमध्ये मोबाईल नेटवर्क का येत नाही?

संतोष कानडे

लिफ्ट

आपण लिफ्टमध्ये जातो तेव्हा मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब होतं.. त्यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहितंय का?

बंदिस्त रचना

यामागचे मुख्य कारण म्हणजे लिफ्टची बंदिस्त रचना. लिफ्टचं केबिन प्रामुख्याने धातूचं बनलेलं असतं.

रेडिओ लहरी

धातूचे आवरण मोबाईल नेटवर्कच्या रेडिओ लहरींना काही प्रमाणात अडवते किंवा कमकुवत करते.

टॉवर

त्यामुळे मोबाईल आणि जवळच्या मोबाईल टॉवरमधील सिग्नलची देवाणघेवाण कमी होते.

काँक्रीटच्या भिंती

लिफ्ट ज्या शाफ्टमधून वर-खाली जाते, तो भागही काँक्रीटच्या भिंतींनी वेढलेला असू शकतो.

सिग्नल

त्यामुळे मोबाईल सिग्नल आणखी कमकुवत होऊ शकतो.

नेटवर्क

लिफ्टमध्ये नेटवर्क मिळणे हे इमारतीची रचना, टॉवरचे अंतर आणि नेटवर्कच्या प्रकारावर अवलंबून असते.

इमारती

काही आधुनिक इमारतींमध्ये रिपीटर किंवा विशेष इन-बिल्डिंग नेटवर्क यंत्रणा बसवलेली असते.

नेटवर्क

म्हणूनच काही लिफ्टमध्ये नेटवर्क चांगले मिळते, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे गायब होते.

अंडी कुणी खाऊ नयेत? कशी घ्यावी काळजी?

<strong>येथे क्लिक करा</strong>