सकाळ डिजिटल टीम
शरीरावर तीळ येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत तुम्हाला माहित आहे का?
शरीरावर तीळ का येतात? आणि त्यावर उपाय काय आहेत जाणून घ्या.
शरीरावर तीळ येण्याची मुख्य कारणे म्हणजे त्वचेतील मेलेनिन-उत्पादक पेशी (मेलेनोसाइट्स) समूहांमध्ये वाढ होणे हे आहे.
सूर्यप्रकाश, अनुवांशिक कारणे आणि हार्मोनल बदल देखील तीळ तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
त्वचेतील मेलेनोसाइट्स नावाच्या पेशी जेव्हा समूहांमध्ये वाढतात, तेव्हा तीळ तयार होतात. या पेशी मेलेनिन नावाचे रंगद्रव्य तयार करतात, ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो.
अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होवू शकते, ज्यामुळे तीळ तयार होऊ शकतात.
तीळ अनुवांशिक देखील असू शकतात. जर आई- वडीलांपैकी कोणाला तीळ असेल तर मुलांना होण्याची शक्यता असते.
पौगंडावस्था, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे तीळ अधिक स्पष्टपणे दिसू शकतात किंवा नवीन तीळ तयार होऊ शकतात.
तुमच्या त्वचेवर काही बदल जाणवल्यास, जसे की तीळ आकार, रंग किंवा आकारात बदल झाल्यास, त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.