संतोष कानडे
इराणी महिलांच्या सौंदर्याची एक अनोखी मोहिनी मुघल साहित्यामध्ये आणि चित्रांमध्ये दिसून येते.
अफाट सौंदर्य, तैलबुद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे मुघलांना आणि बादशहांना इराणी महिला खूप आवडायच्या.
इराणी महिलांनी मुघल साम्राज्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आणि मुघलांना वारसदेखील दिले.
महत्त्वाचं म्हणजे नूरजहान आणि मुमताज महल या दोन्ही शक्तिशाली महिला इराणी वंशाच्या होत्या.
इराणी महिला अत्यंत सुशिक्षित असायच्या. त्यांना इतिहास, साहित्य, काव्य आणि तत्वज्ञानाचं उत्तम ज्ञान होतं.
मुघलांच्या दरबारामध्ये फारसी ही राजभाषा होती. ही भाषा इराणची मातृभाषा. यावरुनच इराणी लोकांचं मुघलांच्या दरबारातलं वर्चस्व सिद्ध होतं.
इराणी महिलांचं बोलणं, वागणं, आदब आणि शिष्टाचार अत्यंत संवेदनशील आणि खानदानी होतं. मुघलांना हेच आवडायचं.
इराणी महिला कुंद कळीसारख्या गौर वर्णाच्या होत्या. त्यांचे डोळे हरिणीसारखे टपोरे आणि काजळ भरलेले असायचे.
नाक धारदार, सरळ आणि गुलाबाच्या पाकळीसारखे नाजूक ओठ.. केस लांडसडक, काळेभोर आणि सुगंधी तेल लावलेले रेशमी असायचे.