Saisimran Ghashi
औरंगजेब हा सर्वात क्रूर मुघल शासक मानला जातो.
त्याने शंभूराजांची हालहाल करून हत्या केली होती.
त्याने स्वतःच्या बापाला देखील त्याच्या क्रूरतेपुढे टिकू दिले नाही.
औरंगजेबाने त्याचे वडील शहाजहानला कैद केले होते आणि मृत्यूपर्यंत कैदेत होते.
औरंगजेबने आपल्या वडिलांना शहाजहानला, कैदेत ठेवण्याचे कारण मुख्यतः राजकीय होते.
शहाजहान आणि त्याच्या मुलांमधील सत्तेसाठी संघर्ष त्यावेळी तणावपूर्ण होता.
औरंगजेबने आपल्या वडिलांना कैदेत ठेवण्याआधी, दाराशिकोहला मारल्याचा आरोप आहे. तो अधिक शांतताप्रिय आणि धार्मिक सहिष्णुतेला महत्त्व देणारा होता जे त्याच्या ध्येयाशी सुसंगत नव्हते.
शाहजहानने मुघल साम्राज्याचा सर्व खजिना ताजमहाल बांधण्यासाठी खर्च केल्यामुळे त्याचा मुलगा औरंगजेब याने त्याला रागाच्या भरात कैद केले असल्याचे म्हटले जाते.
तसेच त्याला काळ्या संगमरवरी ताजमहाल बांधण्याचा आग्रह धरण्यात आला ज्यामुळे खजिन्यात एक पैसाही शिल्लक राहणार नाही. म्हणून त्याने स्वतःच्या वडिलांना कैद केले जेणेकरून तो सिंहासनावर बसू शकेल.