विमानाच्या कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसतात?

संतोष कानडे

एअर इंडिया

अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातानंतर एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे – कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसातात?

नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड

अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (NTSB) या संस्थेने २५ वर्षांपूर्वीच कॉकपिट व्हिडीओ रेकॉर्डरची शिफारस केली होती.

विद्युत पुरवठा

मात्र अनेक देशांनी ही कल्पना फेटाळली. जुन्या विमानांमध्ये जागेची व विद्युतपुरवठ्याची अडचण असली तरी नवीन विमानांमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सहज शक्य आहे.

पायलट

पायलट युनियनकडून याला अनेक कारणांवरून विरोध आहे. प्रायव्हसीचा भंग होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

युनियन

सतत निरीक्षणामुळे कामावर मानसिक दबाव वाढेल. ज्युनियर पायलट सीनियर पायलटच्या निर्णयांना प्रश्न विचारण्यास टाळाटाळ करतील, अशी भीती युनियनला वाटते.

मानसिक आघात

फुटेज लीक झाल्यास पीडितांच्या कुटुंबीयांना मानसिक आघात होऊ शकतो, असंही पायलट युनियनकडून सांगण्यात येतं.

रेकॉर्डर

सध्या विमानांमध्ये दोन प्रकारचे रेकॉर्डर असतात- फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR): इंजिन, उंची, गती, दिशा यासारखा तांत्रिक डेटा साठवतो.

कॉकपिट

दुसरं म्हणजे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR): पायलट आणि एटीसी यांच्यातील संभाषण रेकॉर्ड करतो.

कॅमेरे

चीनने काही व्यावसायिक विमानांमध्ये कॉकपिट कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे.

कामोत्तेजनेसाठी मुघल काय खायचे?

येथे क्लिक करा