Saisimran Ghashi
बँकेत चेक भरताना किंवा पैसे काढायची स्लिप भरताना रक्कमेच्या पुढे only का लिहितात याचा विचार केलंय का?
चेकवर शब्दांमध्ये रक्कम लिहिल्यानंतर शेवटी "ओन्ली" किंवा "फक्त" लिहिणे आवश्यक आहे. हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
चेकवर "ओन्ली" लिहिल्याने, रक्कम वाढवून किंवा बदलून तुमच्या खात्यातून पैसे काढले जाण्याची शक्यता कमी होते.
"ओन्ली" शब्दामुळे कोणतीही फसवणूक किंवा फ्रॉड होण्याचे धोके कमी होतात, कारण तुम्ही लिहिलेली रक्कम निश्चित केली जाते.
चेकवर नंबर्समध्ये लिहिलेल्या रकमेनंतर "/-" हा चिन्ह टाकणे आवश्यक आहे. यामुळे रक्कम संपली आहे, असे स्पष्ट होते.
चेकवर "ओन्ली" लिहिलं नाही किंवा "/-" चिन्ह टाकलं नाही तरी चेक बाऊन्स होत नाही. पण सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे आहे.
"ओन्ली" शब्दामुळे चेकवर शब्दांमध्ये लिहिलेली रक्कम बदलता येत नाही. त्यामुळे तुमच्या खात्याचे संरक्षण होऊ शकते.
बँकेत खाती असलेल्या लोकांनी चेकचा वापर केला तरी "ओन्ली" लिहिणे हे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.