सकाळ डिजिटल टीम
मिरची ही खायला तिखट लागते तरी देखील पोपटाला ही तिखट मिरची खायला आवडते. या मागची कारण काय आहेत जाणून घ्या.
मिरचीमध्ये कॅप्सिन (Capsaicin) नावाचे एक रसायन असते. हे रसायन मानवी शरीरात उष्णता आणि जळजळ निर्माण करते.
मानवाच्या जिभेवर आणि त्वचेवर TRPV1 नावाचे रिसेप्टर्स (संवेदी पेशी) असतात. जेव्हा कॅप्सिन या रिसेप्टर्सच्या संपर्कात येते, तेव्हा मेंदूला जळजळीचा संदेश मिळतो, ज्यामुळे आपल्याला तिखटपणा जाणवतो.
पोपट आणि इतर पक्ष्यांमध्ये हे TRPV1 रिसेप्टर्स नसतात. त्यामुळे, कॅप्सिन त्यांच्या शरीरात कोणताही संदेश पाठवू शकत नाही.
रिसेप्टर्स नसल्यामुळे पोपटांना मिरची खाल्ल्यावर तिखटपणाची कोणतीही जाणीव होत नाही. त्यांच्यासाठी मिरची हे एक सामान्य अन्न आहे, जे इतर फळांसारखेच असते.
मिरचीच्या झाडांनी हे रसायन मुख्यतः सस्तन प्राण्यांपासून (उदा. मानव, उंदीर) स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विकसित केले आहे असे म्हटले जाते.
पोपटाला मिरची आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती त्याच्यासाठी एक पौष्टिक अन्न आहे. मिरचीमध्ये व्हिटॅमिन-ए भरपूर प्रमाणात असते, जे पोपटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
ही एक प्रकारची उत्क्रांती आहे, जिथे वनस्पतींनी स्वतःला अशा प्रकारे विकसित केले आहे की, पक्ष्यांनीच त्यांचे बियाणे दूरवर पसरवावे.
यामागचे कारण मानवी आणि पक्ष्यांच्या चवीची जाणीव आणि उत्क्रांतीमधील फरक आहे, ज्यामुळे निसर्गामध्ये विविध प्राण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खाद्यपदार्थ तयार झाली आहेत.