बाळकृष्ण मधाळे
पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागली की निसर्गात एक वेगळेच सौंदर्य खुलते.
Why do peacocks dance before rain?
esakal
काळे ढग दाटून येतात, गार वारे वाहू लागतात आणि अशा वातावरणात मोर आपल्या रंगीबेरंगी पिसाऱ्यासह थुईथुई नाचताना दिसतो.
Why do peacocks dance before rain?
esakal
हे दृश्य प्रत्येकालाच मोहून टाकणारे असते; पण आकाश ढगाळून आल्यानंतरच मोर पिसारा का फुलवतो, यामागे काही रंजक कारणे आहेत.
Why do peacocks dance before rain?
esakal
पावसाळ्याची सुरुवात हा मोरांच्या विणीचा, म्हणजेच प्रजननाचा हंगाम असतो. या काळात नर मोराला मादी मोर अर्थात लांडोरीला आकर्षित करायचे असते.
Why do peacocks dance before rain?
esakal
त्यासाठी तो आपला भव्य, चमकदार आणि रंगीबेरंगी पिसारा फुलवून तिच्यासमोर नृत्य करतो. या नृत्यातून तो स्वतःची ताकद, आरोग्य आणि सौंदर्य प्रदर्शित करत संभाव्य जोडीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो.
Why do peacocks dance before rain?
esakal
ढग दाटून येणे, वातावरणात गारवा निर्माण होणे आणि विजांचा कडकडाट होणे हे पावसाचे संकेत मानले जातात. निसर्गातील हे बदल मोरांना जाणवतात आणि त्यामुळे ते अधिक उत्साही होतात. या आनंदाच्या भरात मोर पिसारा फुलवून नाचू लागतो.
Why do peacocks dance before rain?
esakal
यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, अन्नाची उपलब्धता.
Why do peacocks dance before rain?
esakal
पावसाळ्यात जंगल, माळराने आणि शेतांमध्ये कीटक, अळ्या, बेडूक आणि इतर खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या पिलांसाठी अन्नाची कमतरता भासणार नाही, याची नैसर्गिक जाणीव मोरांना होते. अनुकूल वातावरणाचे स्वागत करण्यासाठीही ते पिसारा फुलवून नृत्य करतात.
Why do peacocks dance before rain?
esakal
विशेष म्हणजे, आपण ज्याला मोराचा 'पिसारा' म्हणतो, तो प्रत्यक्षात त्याची शेपटी नसते. तो मोराच्या पाठीवरील लांब आणि आकर्षक पिसांचा समूह असतो. खऱ्या शेपटीची पिसे या पिसाऱ्याच्या मागे लपलेली असतात आणि पिसारा उभारून ठेवण्यासाठी आधार देण्याचे काम करतात.
Why do peacocks dance before rain?
esakal
थोडक्यात, पिसारा फुलवणे ही मोराची केवळ सौंदर्यपूर्ण अदा नसून जोडीदाराला आकर्षित करण्याची, आनंद व्यक्त करण्याची आणि निसर्गातील अनुकूल बदलांचे स्वागत करण्याची एक सुंदर नैसर्गिक पद्धत आहे.
Why do peacocks dance before rain?
esakal
Konkan Monsoon Birds
esakal