संतोष कानडे
रात्री आरशात पाहिल्याने नकारात्मक ऊर्जा किंवा भुताटकी शक्ती आकर्षित होतात, असं जुनी लोकं सांगतात.
काही ठिकाणी आरशाला आत्म्यांचे माध्यम मानले जात असे, त्यामुळे रात्री त्याच्यापासून दूर राहिलं जात असे.
रात्री कमी प्रकाशात आरशात पाहिल्यास मेंदू चेहऱ्याचे प्रतिबिंब स्पष्ट ओळखू शकत नाही. त्यामुळे चेहरा विचित्र, हलणारा किंवा भितीदायक वाटू शकतो.
याला Troxler Effect असे वैज्ञानिक नाव आहे. दीर्घ वेळ स्वतःकडे एकटक पाहिल्यास मेंदू काही भाग धूसर करतो आणि भ्रम निर्माण होऊ शकतो.
यामुळे काही लोकांना आरशात वेगळ्या आकृती किंवा सावल्या दिसल्यासारखे वाटते.
म्हणूनच रात्री आरशात पाहू नये ही समज अंधश्रद्धेपेक्षा मानवी मेंदू आणि प्रकाशाच्या परिणामाशी अधिक संबंधित मानली जाते.
काही मानसशास्त्रज्ञांच्या मते, रात्रीच्या शांत वातावरणामुळे मेंदू अधिक संवेदनशील होतो. त्यामुळे भीती, चिंता किंवा कल्पनाशक्ती अधिक तीव्रपणे जाणवू शकते.
पूर्वी घरांमध्ये मंद दिवे किंवा कंदील वापरले जात असल्याने आरशातील प्रतिबिंब अधिक भेसूर दिसत असे. याच कारणामुळे मुलांना रात्री आरशापासून दूर राहण्याची सूचना केली जात होती.