बाळकृष्ण मधाळे
मद्यपान आरोग्यासाठी घातक आहे, हे आपण जाणतोच. त्याचा थेट परिणाम आपल्या 'संज्ञानात्मक क्षमतांवर' (Cognitive Abilities) म्हणजेच विचार करण्याच्या आणि तर्क लावण्याच्या शक्तीवर होतो.
Why People Speak English After Drinking
esakal
पण एक गोष्ट अनेकदा दिसून येते, ती म्हणजे मद्यपान केल्यानंतर माणसाच्या तोंडून अचानक अस्खलित इंग्रजी बाहेर पडू लागते.
Why People Speak English After Drinking
esakal
यामागील कारणांचा शोध 'जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी'मधील एका संशोधनातून घेण्यात आला आहे.
Why People Speak English After Drinking
esakal
अनेक लोकांसाठी इंग्रजी ही दुसरी भाषा असते. ती बोलताना 'माझे व्याकरण चुकेल का?' किंवा 'लोक हसतील का?' अशी एक सुप्त भीती (Language Anxiety) मनात असते.
Why People Speak English After Drinking
esakal
मद्यपान केल्यामुळे मेंदूतील भीती आणि संकोच नियंत्रण करणारा भाग शिथिल होतो, ज्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो.
Why People Speak English After Drinking
esakal
संशोधनानुसार, मद्याचे अल्प प्रमाण भाषेचे अडथळे दूर करण्यास मदत करते. मद्याच्या प्रभावामुळे व्यक्ती निकालाची किंवा प्रतिक्रियेची पर्वा न करता बिनधास्त बोलू लागते. जो संकोच त्यांना शुद्धीत असताना इंग्रजी बोलण्यापासून रोखतो, तो नशेत पूर्णपणे नाहीसा होतो.
Why People Speak English After Drinking
esakal
मद्यपान केल्यानंतर व्यक्तीच्या मनातील फिल्टर निघून जातो. त्यांच्या मनात जे विचार घोळत असतात, ते थेट बाहेर येतात.
Why People Speak English After Drinking
esakal
अनेकदा कामाच्या ठिकाणी किंवा उच्चशिक्षण घेताना इंग्रजीचा वापर होत असल्याने, 'स्मार्ट' दिसण्याच्या इच्छेतून किंवा त्या वातावरणाच्या प्रभावातून मेंदू आपोआप इंग्रजी शब्दांची निवड करू लागतो.
Why People Speak English After Drinking
esakal
'जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी'च्या प्रयोगात असे आढळले की, ज्यांनी थोड्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते, त्यांनी मद्यपान न केलेल्या लोकांच्या तुलनेत परकी भाषा अधिक चांगल्या प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलून दाखवली.
Why People Speak English After Drinking
esakal
संकोच कमी होतो : चुकीची भीती वाटत नाही.
धाडस वाढते : नवीन शब्द प्रयोग करण्याचे धैर्य येते.
स्मरणशक्तीवर परिणाम : काही वेळा सुप्त मनातील साठवलेले इंग्रजी शब्द बाहेर येतात.
Why People Speak English After Drinking
esakal
मद्यपान केल्याने भाषा सुधारते असा याचा अर्थ मुळीच नाही; तर केवळ भाषेबद्दल वाटणारी 'भीती' तात्पुरती कमी होते. मात्र, याचे अतिसेवन केल्याने याच भाषेचा उच्चार स्पष्ट राहत नाही आणि संवाद गोंधळलेला होतो.
Why People Speak English After Drinking
esakal
How Bee Venom Works Against Breast Cancer Cells
esakal