Anushka Tapshalkar
बॅडमिंटन खेळल्याने हृदयाची गती वाढते, रक्त प्रवाह सुधारतो, आणि हृदय व रक्तवाहिन्यांची ताकद वाढते.
बॅडमिंटन खेळताना शरीराला झटके लागतात आणि झटपट हालचाली हाडांच्या घनतेला उत्तेजित करतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात व ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
नियमित बॅडमिंटन खेळल्याने निर्णय घेण्याची क्षमता, लक्ष केंद्रित करणे, आणि स्मरणशक्ती सुधारते.
शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होतो, मन आनंदी राहते, आणि एकाग्रता सुधारते.
बॅडमिंटन खेळताना उडी मारणे, स्ट्रेचिंग आणि पोझीशन बदलणे या क्रिया वाढीच्या हार्मोनला उत्तेजन देतात, ज्यामुळे उंची वाढू शकते.
बॅडमिंटन खेळताना चांगल्या प्रतिक्रिया, लक्ष आणि समन्वयाची गरज असते, ज्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय सुधारतो.
बॅडमिंटन खेळताना शरीराचे अवयव स्ट्रेच करणाऱ्या हालचाली शरीराला लवचिक ठेवतात.
बॅडमिंटन खेळल्यामुळे तुमचं संतुलन, चपळता आणि समन्वय सुधारतो, ज्यामुळे दैनंदिन कामं सोपी होतात.