सकाळ वृत्तसेवा
खाकी वर्दीची क्रेझ भारतीयांमध्ये आहे. पोलिसांची खाकी गणवेश बघितला की आदर आणि भीती वाटायला लागते. पण कधी विचार केलाय का, पोलिसांची वर्दी खाकीच का असते?
ब्रिटीश काळात भारतातील पोलिसांचा गणवेश पांढऱ्या रंगाचा होता. पण तो पटकन मळका व्हायचा. त्यामुळे सतत धुत बसावं लागायचं.
पोलीस बराच वेळ ड्युटीवर असतात. धूळ, माती, घाम यामुळे पांढरी वर्दी लगेच खराब व्हायची.
ब्रिटीश अधिकाऱ्यांनी विचार केला – असा कोणता रंग असेल जो पटकन मळकट दिसणार नाही? जो स्वच्छ दिसेल, वापरणं सोपं असेल?
हलका पिवळा आणि तपकिरी रंग मिसळून खाकी रंग तयार करण्यात आला.
हिंदीत ‘खाक’ म्हणजे माती. म्हणून ‘खाकी’ म्हणजे मातीसारखा रंग. धूळ, डाग दिसू नयेत म्हणून हाच रंग वापरला जातो.
सर हेन्री लॉरेन्स यांनी १८४७ साली पोलिसांसाठी खाकी वर्दी अधिकृत केली. त्यावेळी ते वायव्य सरहद्दीचे गव्हर्नर एजंट होते.
तेव्हापासून भारतभरात खाकी ही पोलिसांची ओळख बनली. ब्रिटिश गेले, पण भारतीय पोलिसांनी खाकी रंग कायम ठेवला.
कोलकाता पोलीस आजही पांढऱ्या वर्दीत असतात! कारण तिथे हवामान दमट आहे.