पुण्यातल्या या विठ्ठलाला 'प्रेमळ विठोबा' का म्हणतात?

Aarti Badade

शनिवारवाड्याच्या जवळ एक शांत मंदिर

पुण्याच्या मध्यभागी, गणेश दरवाजासमोर एक सुंदर मंदिर आहे. ते प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे – श्री प्रेमळ विठोबा मंदिर.

Premal Vithoba of Pune | Sakal

१९०४ साली बांधलेले श्रद्धेचे स्थान

भीमाबाई देवकर या श्रद्धाळू महिलेने हे मंदिर १९०४ साली बांधले. ते पांडुरंगाच्या प्रेमळ रूपाची आठवण करून देते.

Premal Vithoba of Pune | Sakal

'प्रेमळ विठोबा' – नावामागचा अर्थ

जो या विठोबाची पूजा करतो, त्याला पांडुरंगाच्या प्रेमाचा अनुभव येतो. म्हणूनच त्यांना "प्रेमळ" विठोबा म्हणतात.

Premal Vithoba of Pune | Sakal

सभामंडपात गरुडाचे सौंदर्य

मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ संगमरवरी गरुडाची मूर्ती आहे. त्याचे हात जोडलेले आहेत आणि डोळ्यात भक्तीचा भाव आहे.

Premal Vithoba of Pune | Sakal

लाकडी छत आणि झुंबरांनी सजलेले सभागृह

मंदिराला दोन मजले आहेत. त्यात कोरलेले लाकडी छत आणि झुंबरांनी सुंदर केलेला सभामंडप आहे. तो मन मोहून टाकतो.

Premal Vithoba of Pune | Sakal

शांत गाभारा

काही पायऱ्या चढून गेल्यावर आधी अंतराळ येते. त्यानंतर दगडी बांधणीचा गाभारा आहे. तिथे राही, पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत.

Premal Vithoba of Pune | Sakal

भीमाबाईंचे स्मरण स्थान

मंदिराच्या सभामंडपात डावीकडे भीमाबाई देवकर यांचे स्मृतीस्थळ आहे. त्यांनीच हे मंदिर बांधले.

Premal Vithoba of Pune | Sakal

संध्याकाळी भक्तीरसाची बरसात

येथे दररोज रात्री नामस्मरण आणि भजन होते. यामुळे गाभाऱ्याचे वातावरण श्रद्धेने भरून जाते.

Premal Vithoba of Pune | Sakal

उत्सव आणि विशेष कार्यक्रम

गोकुळाष्टमी, कृष्णजन्मोत्सव आणि वैशाखातील विशेष दिवशी येथे हरिनाम सप्ताह, चंदन उटी आणि कीर्तन होते.

Premal Vithoba of Pune | Sakal

पनवेलमधल्या या झाडाखाली तुकोबा विकायचे मिरची

Saint Tukaram Maharaj | Sakal
येथे क्लिक करा