रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोबाईल फोन का वापरत नाही? खरे कारण ऐकून थक्क व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

पुतिन भारत दौऱ्यावर


रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन कालपासून भारतात आहेत. दोन्ही देशांमधील 25 वर्षांच्या रणनीतिक भागीदारीच्या निमित्ताने हा दौरा महत्त्वाचा आहे.

Putin and Modi

|

Sakal

दौऱ्यापूर्वी सुरक्षा चर्चेत


पुतिनच्या भेटीपूर्वी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत मोठी चर्चा सुरू आहे. कारण त्यांची सुरक्षा जगातील सर्वात सुरक्षित समजली जाते.

Putin Security

|

Sakal

मोबाइल फोन वापरत नाही


जगातील सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक असूनही पुतिन स्मार्टफोन वापरत नाहीत. यामागे खूप मोठे कारण आहे.

Powerful Leader

|

Sakal

प्रत्येक पावलावर धोका


पुतिन अशा नेत्यांपैकी आहेत ज्यांना सतत त्यांच्या जीवाचा धोका आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा वेगळी आणि अत्यंत गोपनीय ठेवली जाते.

Putin security reason

|

Sakal

परदेश दौऱ्याची कठोर तपासणी


ते कोणत्याही देशात गेले तरी हॉटेलपासून जेवणापर्यंत सर्व गोष्टींची बारकाईने तपासणी केली जाते. ते ज्या ठिकाणी राहतात तो परिसर आधी सैनिटाइज केला जातो.

Putin Security Check

|

Sakal

क्रेमलिनमध्ये स्मार्टफोनवर बंदी


क्रेमलिन जेथे रशियाचे सत्ता केंद्र आहे. त्या ठिकाणी मोबाइल फोन वापरण्यावर पूर्णपणे बंदी आहे. तेथे कोणताही स्मार्टफोन नेण्याची किंवा वापरण्याची परवानगी नाही.

Putin

|

Sakal

पुतिन स्वतः स्मार्टफोन वापरत नाहीत


पुतिन यांनी स्वतः सांगितले आहे की ते फोन वापरत नाहीत. त्यांना कोणाशी बोलायचे असल्यास ते अधिकृत सरकारी फोन लाइन वापरतात.

Putin Phone 

|

Sakal

प्रवक्त्यांचे वक्तव्य


प्रवक्ता दिमित्री पेस्कोव यांनी याआधी सांगितले की पुतिन वेळेअभावी फोन वापरत नाहीत. मात्र खरे कारण सुरक्षा असल्याचे मानले जाते.

Security Clarification

|

Sakal

मोबाइलवर अविश्वास हेच खरे कारण


पुतिन इंटरनेटशी जोडलेल्या कोणत्याही डिव्हाइसवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटते की अशा उपकरणांमुळे त्यांची माहिती आणि सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे त्यांच्या आसपासही स्मार्टफोन ठेवले जात नाहीत.

No Trust

|

Sakal

Gold Insurance

|

Sakal 

दागिने चोरी गेले तर इन्शुरन्स मिळतो का? ही माहिती वाचवेल तुमची लाखोंची गुंतवणूक!