2, 5 रुपयांच्या नोटांची छापाई बंद, मग एका रुपयाची प्रिंटिंग का चालू?

संतोष कानडे

नोटा

पूर्वी भारतात १, २ आणि ५ रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जायचा.

छपाई

मात्र १९९४ ते १९९५ दरम्यान या तिन्ही नोटांची छपाई टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली.

देखभाल

कमी किमतीच्या नोटा लवकर फाटत आणि खराब होत असल्यामुळे त्यांची छपाई व देखभाल महाग पडत होती.

टिकाऊ नाणी

त्यामुळे २ आणि ५ रुपयांच्या नोटांऐवजी टिकाऊ नाणी चलनात आणण्यात आली.

एक रुपया

एक रुपयाच्या नोटेची छपाईही १९९४ मध्ये थांबवण्यात आली होती.

एक रुपया

मात्र २०१५ मध्ये केंद्र सरकारने एक रुपयाची नोट पुन्हा छापण्याचा निर्णय घेतला.

RBI

एक रुपयाची नोट ही RBI जारी करत नाही, तर भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून जारी केली जाते.

गव्हर्नर

या नोटेवर RBI गव्हर्नरऐवजी भारत सरकारच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते.

छपाई

विशेष म्हणजे २ आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटांची छपाई बंद असली, तरी त्या आजही कायदेशीर चलन आहेत.

नोट

म्हणजेच एक रुपयाची नोट पुन्हा जारी केली जाते, तर २ आणि ५ रुपयांच्या व्यवहारांसाठी प्रामुख्याने नाण्यांचा वापर केला जातो.

मुघलांच्या शयनकक्षात ऐषोआरामाच्या कोणत्या वस्तू असायच्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>