Monika Shinde
भाजलेल्या चण्यांना 'शुक्रवार फुटाणे' का म्हणतात असे तुम्हाला ही हाच प्रश्न पडला असेल ना चला तर जाणून घेऊया यामागचं कारण काय आहे.
शुक्रवारी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी देवीला भाजलेले चणे आणि खडी साखर नैवैद्य म्हणून ठेवतात. त्यामुळे चण्यांना 'शुक्रवारचे फुटाणे' म्हटलं जातं.
अनेक लोकांचा विश्वास आहे की शुक्रवारी देवीला फुटाणे अर्पण केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. त्यामुळे ही प्रथा आजही टिकून आहे.
शुक्रवारी उपवास करणारे अनेक जण भाजलेले चणे खाणे पसंत करतात. ते हलके, पचायला सोपे आणि प्रथिनेयुक्त असतात उपवासासाठी आदर्श.
फुटाणे म्हणजे प्रोटीन, फायबर, लोह आणि ऊर्जा यांचा उत्तम स्रोत आहे. शक्यतो उपासनेत पौष्टिकतेची जोड देण्यासाठी यांचा समावेश होतो.
पूर्वीपासून ग्रामीण भागात आणि मंदिरांमध्ये शुक्रवारच्या पूजेनंतर फुटाणे वाटण्याची परंपरा होती. आज ती शहरांमध्येही लोकप्रिय आहे.
आजही अनेक बाजारांमध्ये फुटाण्यांना “शुक्रवार फुटाणे” म्हणूनच विचारलं जातं.