तुषार देशपांडेच्या 'त्या' चेंडूने केलं ऋतुराजला IPL 2025 मधून बाहेर

Pranali Kodre

ऋतुराज आयपीएल २०२५ मधून बाहेर

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सध्या सुरू असतानाच १० एप्रिलला मोठी बातमी समोर आली. चेन्नई सुपर किंग्सचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

धोनी पुन्हा कॅप्टन

त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद पुन्हा एकदा एमएस धोनी सांभाळताना दिसणार आहे.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

फ्रॅक्चर

दरम्यान, ऋतुराजला डाव्या हाताच्या कोपराला छोटे फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याला या हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

कधी झाली दुखापत?

पण अनेकांना त्याला ही दुखापत कधी झाली, हे माहित नसेल.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

RR vs CSK

३० मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सचा सामना गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध झाला होता, याच सामन्यात ऋतुराजला ही दुखापत झाली.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

तुषार देशपांडे

या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे गोलंदाजी करत होता.

Tushar Deshpande | Sakal

हाताला जोरात लागला चेंडू

तुषारच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याच्या अपेक्षेपेक्षा चेंडू धीम्यागतीने आता आणि त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला जोरात लागला.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

असह्य वेदना

त्याक्षणी ऋतुराजला वेदना असह्य झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याला त्यावेळी फिजिओने पेन रिलीफ स्प्रे मारून पेन किलर गोळीही दिली होती. त्यानंतर ऋतुराजने अर्धशतक साकारले.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

नंतरही खेळला, पण...

या सामन्यानंतरही ऋतुराजने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध देखील खेळला, पण त्याला ५ आणि १ धावच करता आली.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

फ्रॅक्चर

दरम्यान, त्याच्या कोपारचे एमआरआयचे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर त्याला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

आयपीएल २०२५

ऋतुराजने आयपीएल २०२५ मध्ये ५ सामन्यात खेळताना दोन अर्धशतकांसह १२२ धावा केल्या होत्या.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

सर्वाचं लक्ष तिच्याकडे, पण त्याच्या वेदना कुणाला दिसल्या नाही... Viral VIdeo ची दुसरी बाजू

CSK Fans | Sakal
येथे क्लिक करा