Aarti Badade
साबुदाणा हा उपवासात खाल्ला जाणारा प्रमुख घटक आहे कारण तो पचायला सोपा असून शरीराला भरपूर ऊर्जा देतो.
साबुदाण्यात मुबलक कार्बोहायड्रेट्स असतात. हे शरीराला उपवासात आवश्यक असलेली ऊर्जा देण्यास मदत करतात.
साबुदाणा सहज पचतो, त्यामुळे उपवासात अन्न न खाल्ल्यामुळे होणारी अपचन, जडपणा टाळता येतो.
साबुदाणा खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि उपवास करणं सोपं जातं.
साबुदाणा बाजारात सहज मिळतो आणि उपवासात त्याचे खिचडी, वडे, थालीपीठ हे पारंपरिक पदार्थ म्हणून खाल्ले जातात.
साबुदाण्याऐवजी फळं, दूध, दही, राजगिरा, कुट्टू पीठ यासारखे पर्याय देखील उपवासासाठी योग्य आहेत.
साबुदाण्यात स्टार्च जास्त असल्याने मधुमेह असलेल्यांनी तो खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.