Payal Naik
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतीच दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे.
तिने यात तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे. सईने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं.
पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि ते अवघ्या दोन वर्षात विभक्त झाले.
हाफ्टरफ्लाय ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपली फसवणूक झाल्याचं मान्य केलं.
सई म्हणाली, मला फसवलं गेलं. त्याचे बाहेरही कुणाशीतरी संबंध होते.
मी खूप कमी वयात एका अत्यंत वाईट नात्यात होते
त्यामुळे मी वेगळं व्हायचं ठरवलं.' लग्न झालं तेव्हाही सई अभिनेत्री होती.
तेव्हा अनेकांना सईचं लग्न झालंय आणि घटस्फोट झालाय हे ठाऊक नव्हतं.