मजबूत आणि निरोगी नात्यांसाठी स्वत:वर प्रेम करणं का आवश्यक आहे?

Anushka Tapshalkar

स्वतःवर प्रेम

स्वतःवर प्रेम हीच प्रत्येक नात्याची खरी पायाभूत गोष्ट आहे. “सोमेट, ट्विन फ्लेम” अशा संकल्पनांमुळे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहून स्वतःला अपूर्ण समजतो, पण हे खरे नाही.

परफेक्ट हाफ

‘परफेक्ट हाफ’ ही कल्पना एक भ्रम आहे. प्रत्येक व्यक्ती पूर्ण असते, आणि दुसऱ्याकडून संपूर्णता शोधणे शेवटी निराशा आणि भावनिक असमतोल निर्माण करते.

Relationship Tips

|

Sakal

मानसिक स्थिरता

नाती तेव्हाच अधिक निरोगी होतात जेव्हा दोन “हील झालेले” व्यक्ती एकत्र येतात. एकमेकांना बदलण्याऐवजी समजून घेणे महत्त्वाचे असते.

Mental Health

|

Sakal

आरशासारखं नातं

प्रत्येक नातं हे आरशासारखे असते. आपल्या आतल्या भावना, भीती आणि अपूर्णतेचे प्रतिबिंब आपल्याला नात्यांमध्ये दिसते.

बालपणीचे अनुभव

बालपणातील अनुभव किंवा नकारात्मक आठवणींमुळे आपण बाहेरून मान्यता आणि प्रेम शोधू लागतो, ज्यामुळे नात्यांमध्ये अपेक्षांचे ओझे वाढते.

स्वत:सोबतचं नातं

स्वतःशी नाते मजबूत करणे गरजेचे आहे—स्वतःला स्वीकारणे, आपल्या गरजा समजून घेणे आणि स्वतःचा सन्मान करणे हे आत्मप्रेम वाढवते.

स्वत:चा विकास

जेव्हा स्वत: वरचं प्रेम मजबूत होते, तेव्हा नाती भीतीवर नाही तर विश्वास, स्वातंत्र्य आणि खर्‍या आनंदावर उभी राहतात; आणि प्रेम हे विकासाचे आणि शांतीचे माध्यम बनते.

प्रेमात पडल्यावर मेंदूत नेमकं काय घडतं? Love is Blind मागचं लॉजिक उलगडलं

What Happen to Brain When You Fall in Love

|

sakal

आणखी वाचा