हिवाळ्यात शिंगाड्याच सेवन का करावं?

Monika Shinde

शिंगाडा

हिवाळात शरीराला ऊब आणि अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते. अशा वेळी शिंगाड्यांचे सेवन खूप फायदेशीर ठरते.

ऊर्जा प्रदान करणारा स्रोत

शिंगाड्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. त्यामुळे थंडीत थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

हिवाळ्यात पचनसंस्था सुस्त पडते, परंतु शिंगाड्यांचे सेवन केल्याने पचन तंत्र सुरळीत कार्य करते. ज्यामुळे गॅस, अपचन आणि कब्ज समस्यांपासून आराम मिळतो.

किडनीसाठी उपयुक्त

हिवाळ्यात शिंगाडे किडनी स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतात. यामध्ये पोटॅशियम आणि इतर खनिजे असतात जे किडनीसाठी चांगले असतात.

हाडांच्या मजबूतीसाठी

शिंगाड्यांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा समावेश असतो, जे हाडांची मजबूती वाढवते.

त्वचेसाठी फायदेशीर

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, परंतु शिंगाड्यांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडन्ट्समुळे त्वचेची त्वरीत निखार येतो. आणि कोरडी आणि तगडी होण्यापासून वाचवते.

वजन नियंत्रणासाठी

शिंगाड्यांमध्ये कमी कॅलोरी असून पचन तंत्र उत्तम ठेवतो, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.

इम्युनिटी वाढवते

शिंगाड्यांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हिवाळ्यात ठणकलेल्या सर्दी, खोकला आणि इन्फेक्शनपासून दूर राहता येते.

हिवाळ्यातील आहारात करा 'या' ७ पौष्टिक फळं आणि भाज्यांचा समावेश

आणखी वाचा