सूरज यादव
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसतेय. दरम्यान, आज बाजार उघडताच चांदीच्या किंमती कोसळल्या.
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
एमसीएक्सवर मार्च महिन्याचे फ्युचर्स एक तासात २१ हजारांनी घसरून प्रति किलो २ लाख ३३ हजार १२० रुपयांवर पोहोचले. दिवसाच्या सुरुवातील हीच किंमत २ लाख ५४ हजारांच्या वर होती.
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात चढ उतार दिसून आला. सोमवारी दर पहिल्यांदाच ८० डॉलर प्रति औंस पेक्षा जास्त झाला. होता.
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
फायद्यासाठी विक्री आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे झेलेन्स्की यांच्या चर्चेच्या वृत्तानंतर ७५ डॉलरपर्यंत खाली आल्या.
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
चांदीच्या दरात मोठ्या घसरणीमागचं प्रमुख कारण गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बूकिंग आणि राजकीय अस्थिरता कमी होणं हे आहे. युक्रेनमध्ये शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक कमी झाली.
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
चांदीच्या दरात वर्षभरात १८१ टक्के इतकी मोठी वाढ झालीय. यामुळे आता फायदा मिळवण्यासाठी विक्री केली जात आहे. चांदीचा ट्रेंडही अजून सकारात्मक आहे. यात चढऊतार राहण्याचा अंदाज आहे..
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
चांदी २.४० लाखापर्यंत काही काळ राहील असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केलाय. तर अमेरिकन कंपनी BTIGने इशारा दिलाय की चांदीच्या दरातली वाढ जास्त काळ टिकणार नाही, यात घसरण होऊ शकते.
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
१९७९-८० मध्ये आणि २०११ मध्येही चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. यानंतर चांदीचे दर अनुक्रमे ९० टक्के ते ७५ टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. गेल्या तीन वर्षात चांदीचे दर तीनपट वाढले आहेत.
Reasons Behind Sudden Drop In Silver Prices
Esakal
Maharashtra mysterious village
esakal