Aarti Badade
यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट २०२५, शनिवारी साजरा होणार. श्रावण पौर्णिमेला बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधून रक्षणाचे वचन घेतात.
तुम्ही पाहिले असेल – बहिणी राखी बांधताना तीन गाठी बांधतात. या गाठींमागे आहे श्रद्धा आणि आध्यात्मिक महत्त्व.
ब्रह्मा: सृष्टीचे निर्माता, पहिली गाठ जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि चांगली सुरुवात घडवते.
विष्णू: पालनकर्ता व रक्षक भावाच्या समृद्धी, आरोग्य आणि रक्षणासाठी दुसरी गाठ.
महादेव: संहारक व मुक्तिदाता वाईट शक्ती आणि दुष्कर्मांपासून संरक्षणाचे प्रतीक.
प्रेम – नात्याचा गोडवा
विश्वास – अविचल नाते
संरक्षण – आयुष्यभराचा आधार
९ ऑगस्ट, सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ एकूण वेळ – ७ तास ३७ मिनिटे
राखीचा प्रत्येक धागा – बहिणीच्या प्रेमाचा आणि भावाच्या रक्षणाचा साक्षीदार.