साप लघवी का करत नाहीत? पिलेल्या पाण्याचं काय होतं?

संतोष कानडे

साप

इतर प्राणी किंवा मानवाप्रमाणे साप लघवी करत नाहीत. मग त्यांनी पिलेल्या पाण्याचं काय होतं? असा प्रश्न पडतो.

लघवी

साप पाण्यासारखी पातळ लघवी करीत नाहीत. पाण्याचं संवर्धन करण्यासाठी त्यांचं शरीर लघवीचं रुपांतर युरिक अ‍ॅसिडमध्ये करतं.

युरिक अ‍ॅसिड

हे युरिक अ‍ॅसिड म्हणजे पांढऱ्या रंगाच्या खडूची पेस्ट करावी, तसं घन स्वरुपात असतं.

शरीरातील पाणी

साप हे सहसा कोरड्या वातावरणात राहतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी टिकून रहावं, यासाठी ही रचना निसर्गाने केलेली आहे.

टाकाऊ पदार्थ

कमीत कमी पाण्यात शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची ही प्रणाली आहे.

विष्ठा आणि लघवी

सापांना लघवी आणि विष्ठा शरीराबाहेर टाकण्यासाठी वेगवेगळी द्वारं नसतात. एकाच मार्गातून ते विष्ठा आणि लघवी एकत्र बाहेर टाकतात.

पक्षी

साप आणि पक्षी दोघेही त्यांची लघवी द्रवस्वरुपात शरीराबाहेर टाकत नाहीत, तर पांढऱ्या पेस्टसारख्या युरिक अ‍ॅसिडच्या स्वरुपात टाकतात.

पांढरा भाग

पक्षांची विष्ठा आपण नेहमी बघतो, त्यात एक भाग पांढरा आणि एक भाग काळा असतो. जो पांढरा भाग असतो ती त्यांची लघवी.

सरपटणे

पक्षांना हवेत उडण्यासाठी किंवा सापांना सरपट चालून बिळात जाण्यासाठी अशा पद्धतीने शारीरिक रचना करण्यात आलेली आहे.

वाघाच्या लघवीची जंगलाला असते दहशत; देतो 'हे' 5 इशारे

<strong>येथे क्लिक करा</strong>