Anushka Tapshalkar
लघवी झाल्यानंतर काही सेकंदांनी किंवा शौचालयातून बाहेर पडल्यावर अचानक थेंब पडणे – याला पोस्ट मिक्टुरिशन ड्रिबल (PMD) म्हणतात.
What is PMD
sakal
PMD हा त्रास तरुण पुरुषांनाही होतो. वय वाढल्यावरच होतो असा गैरसमज चुकीचा आहे.
Not Only Elder Men
sakal
PMD होण्यामागे मुख्य कारणं म्हणजे पेल्विक फ्लोअर स्नायूंची कमजोरी, मूत्रमार्गात थोडे मूत्र अडकून राहणे, चुकीची लघवी करण्याची पद्धत आणि बसून राहण्याची सवय.
Main Causes
sakal
PMD ची लक्षणं म्हणजे लघवी झाल्यानंतर थेंब पडणे, अंडरवेअर ओलं होणे, शौचालयाबाहेर आल्यावर अस्वस्थता आणि दिवसभर ओलसरपणा जाणवणे.
PMD Symptoms
sakal
पोटाखालील स्नायू, टिश्यू आणि लिगामेंट्सची मजबूत पण लवचिक थरासारखी रचना, जी मूत्राशय, मूत्रमार्ग, आतडी आणि प्रोस्टेटला आधार देते.
What is Pelvic Floor
sakal
अनेक वेळा PMD फक्त स्नायूंच्या कार्याशी निगडित असतो. तरुणांमध्ये प्रोस्टेटचा आजार नसतानाही हा त्रास होतो.
prostate
sakal
PMD चे निदान करण्यासाठी लक्षणांचा इतिहास, शारीरिक तपासणी आणि गरज असल्यास यूरोफ्लोमेट्री किंवा युरीन ॲनालिसिस केले जाते.
Diagnosis
sakal
PMD कमी करण्यासाठी पेल्विक फ्लोअर व्यायाम (किगल्स) नियमित करणे, यूरेथ्रल मिल्किंग करून स्क्रोटम मागील भागावर हलका दाब देणे आणि 'ब्लॅडर डायरी' ठेवून लघवीचे पॅटर्न नोंदवणे उपयुक्त ठरते.
Easy Home Remidies
sakal
जर लघवीतून रक्त, जळजळ किंवा वेदना, कमजोर प्रवाह किंवा वारंवार संसर्ग दिसत असतील, तर अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
Symptoms
sakal
PMD मुळे लाज, चिंता, आत्मविश्वास कमी होणे आणि सामाजिक प्रसंग टाळण्याची प्रवृत्ती दिसते. योग्य व्यायाम आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हा त्रास सहज कमी करता येतो.