Aarti Badade
तुम्हालाही कधीतरी एखादं गाणं सतत डोक्यात वाजल्याचा अनुभव येतो का? याला 'ब्रेन इच' किंवा 'इअरवर्म' म्हणतात.
काही विशिष्ट धून किंवा गाणी आपल्या मेंदूत का अडकतात, यावर शास्त्रज्ञ अजूनही संशोधन करत आहेत. मेंदूची ही एक गंमतच आहे!
काहीवेळा गाणं मेंदूला पूर्णपणे समजून घेता येत नाही किंवा त्यावर प्रक्रिया होत नाही, त्यामुळे ते सतत वाजत राहतं.
काही संशोधकांच्या मते, डोक्यात अडकलेली गाणी म्हणजे आपल्या मेंदूला सोडता न येणारे 'नको असलेले विचार'च असतात.
तुम्ही खूप संगीत ऐकत असाल, खासकरून झोपण्यापूर्वी, तर मेंदू झोपेतही त्या गाण्यांवर प्रक्रिया करत राहू शकतो.
यावर एक सोपा उपाय म्हणजे, ते गाणं पूर्णपणे ऐका! पूर्ण ऐकल्यावर मेंदूला समाधान मिळतं आणि ते डोक्यातून निघून जातं.
दुसरा उपाय म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे वळवा. गाण्याऐवजी दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास ते डोक्यातून बाहेर पडू शकतं.