ताजमहलमध्ये आजपर्यंत एकही लाईट का लावण्यात आला नाही?

Shubham Banubakode

जगप्रसिद्ध वास्तू

आग्य्रातील ताजमहाल त्याच्या पांढऱ्याशुभ्र संगमरवरासाठी ओळखला जातो. मात्र, रात्री ही सुंदर वास्तू पूर्णपणे अंधारात असते.

Taj Mahal

|

esakal

कारण

इतर ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे ताजमहालावर रात्री दिवे लावले जात नाहीत. त्यामागे या वास्तूचं सौंदर्य आणि संगमरवर सुरक्षित ठेवण्याचा उद्देश आहे.

Taj Mahal

|

esakal

किड्यांचा धोका

यमुना नदीजवळील कीटक रात्री प्रकाशाकडे आकर्षित होतात. हे कीटक संगमरवरी भिंतींवर बसल्यास त्यांच्या विष्ठेमुळे दगडावर डाग पडू शकतात.

Taj Mahal

|

esakal

भीती

कीटकांमुळे संगमरवरावर पिवळे, हिरवे आणि काळे डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ताजमहालाचं नैसर्गिक सौंदर्य आणि चमक कमी होऊ शकते.

Taj Mahal

|

esakal

अनुभव

१९९७ मध्ये संगीतकार यन्नी यांच्या कार्यक्रमावेळी ताजमहालावर लाईट्स लावण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भिंतींवर मोठ्या प्रमाणात कीटक दिसले.

Taj Mahal

|

esakal

सुरक्षेचाही विचार

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी ताजमहाल झाकण्यात आला होता. रात्रीच्या उजेडात शत्रूच्या विमानांना वास्तूची ओळख करून देऊ शकते.

Taj Mahal

|

esakal

ताजमहालाचं सौंदर्य

ताजमहालाला लाईट्सची गरज नाही. पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात पांढरा संगमरवर सुंदर चमकतो आणि वास्तूचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.

Taj Mahal

|

esakal

कडक नियम

ताज ट्रॅपेजियम झोनमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी विविध नियम लागू आहेत. नैसर्गिक चमक आणि ऐतिहासिक रचना टिकवण्यासाठी रात्रीचे लाईट्स टाळले जातात.

Taj Mahal

|

esakal

नोव्हेंबरमध्ये फिरायचंय? भारतातील ही ७ ठिकाणं आहेत बेस्ट

nov

|

esakal

हेही वाचा