सकाळ वृत्तसेवा
मेट गाला हा एक वार्षिक फंडरेझिंग इव्हेंट आहे जो मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्ट्यूम इंस्टिट्यूटसाठी आयोजित केला जातो.
मेट गालाला “फॅशनचा ऑस्कर” असंही म्हटलं जातं. इथे जगातील सगळ्यात मोठे कलाकार, डिझायनर्स, आणि सेलेब्रिटी उपस्थित राहतात.
सिंगल टिकट: अंदाजे 50,000 डॉलर (सुमारे ₹41 लाख)
टेबल बुकिंग: 3 लाख ते 5 लाख डॉलर पर्यंत
हायप्रोफाईल फॅशन इव्हेंट असल्यामुळे तिकिटांचे दर वर्षागणिक वाढतच आहेत. प्रवेश मिळवणंही फार कठीण आहे.
मेट गालाची सुरुवात 1948 मध्ये एलिनोर लैम्बर्ट यांनी एक डिनर पार्टी म्हणून केली होती.
या इव्हेंटमधून मिळणारा निधी म्युझियमच्या कॉस्ट्यूम इंस्टिट्यूटसाठी वापरला जातो.
मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्ट्यूम सेंटरला आता आना विंतूर सेंटर म्हणतात.
तुमचं इन्व्हिटेशन आना विंतूर कडूनच येतं. पैसे असूनही इथे येण्याची परवानगी मिळेलच असं नाही!
मेट गालामुळे दरवर्षी हजारो लोक म्युझियममध्ये येतात. यामुळे आर्ट आणि फॅशन दोन्हीला चालना मिळते.
हे इव्हेंट म्हणजे फॅशन आणि सामाजिक भान यांचं एक अतुलनीय उदाहरण आहे.