गणपतीच्या पुजेत तुळशीची पानं का वापरली जात नाही?

Shubham Banubakode

गणपतींची तपश्चर्या

एकदा गणपती नदीकाठी शांतपणे ध्यान आणि तपश्चर्या करत बसले होते. त्यावेळी तुळशी देवी तेथून जात होती.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

तुळशी प्रभावित

गणपतींचं रूप आणि व्यक्तिमत्त्व पाहून तुळशी देवी प्रभावित झाली. तिच्या मनात गणपतींशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

मनातील इच्छा

तुळशी देवीने गणपतींसमोर आपल्या मनातील इच्छा सांगितली. तिने त्यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र गणपतींनी तो नाकारला.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

विवाहाला नकार

गणपतींनी आपण तपश्चर्या करत असून ब्रह्मचर्याचं पालन करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे विवाह करणं शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

तुळशी देवीचा शाप

गणपतींनी विवाहाला नकार दिल्याने तुळशी देवीला खूप दुःख झालं. रागाच्या भरात तिने गणपतींना शाप दिला.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

उलट शाप

तुळशीच्या शापानंतर गणपतींनीही तिला शाप दिला. भविष्यात तुझा विवाह एका असुराशी होईल, असं त्यांनी सांगितलं.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

पश्चात्ताप

शाप दिल्यानंतर दोघांनाही आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. त्यांनी एकमेकांना दिलेले शाप मागे घेतले आणि हा वाद तिथेच संपला.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

गणेशपूजेत तुळस वर्जित

या घटनेनंतर गणेशपूजेत तुळशीपत्र न वाहण्याची परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं. त्याऐवजी दुर्वा, शमीची पाने आणि विविध पत्री अर्पण केली जाते.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

पौराणिक कथा

वरील माहिती पौराणिक कथेनुसार आणि उपलब्ध माहितीनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी चर्चा करावी.

Why is Tulsi not offered to Lord Ganesha

|

esakal

या मुघल बादशहाने गादीवर बसताच दान केली होती लाखो बीघा जमीन

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

हेही वाचा -