रिमोट कंट्रोलवर बटणे वेगवेगळ्या आकाराची का असतात?

Apurva Kulkarni

रिमोट

घरात टिव्ही पाहताना तुमच्या लक्षात आलं असेल की, रिमोटवरील बटणं ही वेगवेगळ्या आकाराची असतात. परंतु असं का जाणून घेऊया...

TV REMOTE

|

esakal

वेगवेगळी बटणं

वेगवेगळी बटणं असण्यामागचं मुख्य कारण म्हणजे वापरकर्त्याला न पाहता बटण ओळखता यावं.

REMOTE CONTROL

|

esakal

स्पर्शावरून ओळखता यावं

आपलं लक्ष स्कीनकडे असतं अशावेळी वेगवेगळ्या आकाराची बटणं असल्यास केवळ बोटाच्या स्पर्शावरूनच योग्य बटन ओळखता येतं.

BUTTON SIZE

|

esakal

आकारावरून अंदाज

रात्रीच्या वेळी किंवा अंधार असलेल्या खोलीत टीव्ही पाहताना अक्षरं दिसत नाही. अशावेळी आकारावरून योग्य अंदाज लावता येऊ शकतो.

TV BUTTONS,

|

esakal

सतत वापरली जाणारी बटणं

तसंच रिमोटवरील सतत वापरली जाणारी बटणं वापरकर्त्याच्या बोटांना सहज वापरता यायला हवी यासाठी ती बटणं मोठी ठेवली जातात.

, REMOTE DESIGN

|

esakal

छोटी बटणं

तसंच पॉवर ऑफ, रीसेट, म्युट यासारखी बटणं आकाराने लहान आणि आतल्या बाजूला ठेवली जातात. कारण ती चुकून दाबली जाऊ नये.

POWER BUTTON,

|

esakal

ज्येष्ठ नागरिकांसाठी

तसंच ज्या वापकरर्त्याला नीट दिसत नाही किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनाही रिमोट सहज वापरता येतो.

VOLUME BUTTON

|

esakal

हॉटेलच्या बेडशीट नेहमी पांढऱ्याच रंगाचे का असतात?

HOTEL CLEANING

|

esakal

हे ही पहा...