महिलांनो 'UTI' अन् वारंवार लघवीचा त्रास वाढतोय? 'हे' 7 नियम पाळा, संसर्ग टाळा!

Aarti Badade

थंडी आणि लघवीचा त्रास

महिलांना वारंवार लघवीला होण्याचा त्रास प्रकर्षाने जाणवतो. थंडीमुळे शरीराला घाम कमी येतो, परिणामी शरीरातील अतिरिक्त द्रव मूत्रावाटे बाहेर टाकला जातो.

Urinary tract infection prevention

|

Sakal

युटीआय (UTI) म्हणजे काय?

मूत्रमार्गात बॅक्टेरिया वाढल्यामुळे होणाऱ्या संसर्गाला 'युटीआय' म्हणतात. हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे लघवी घट्ट होते, ज्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.

Urinary tract infection prevention

|

Sakal

थंडीत संसर्ग का वाढतो?

थंडीत पाणी कमी प्यायले जाते. हवामानातील बदलामुळे संसर्गाशी लढण्याची शरीराची क्षमता कमी होते.सतत उबदार आणि घट्ट कपड्यांमुळे ओलावा साचून बॅक्टेरिया वाढतात.

Urinary tract infection prevention

|

Sakal

कोमट पाण्याचे महत्त्व

तहान लागत नसली तरी दिवसातून किमान ८-१० ग्लास कोमट पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी घटक आणि बॅक्टेरिया बाहेर टाकण्यास मदत करते.

Urinary tract infection prevention

|

Sakal

कपड्यांची निवड

सैल आणि सूती (Cotton) अंतर्वस्त्रांचा वापर करा. यामुळे ओलावा टिकून राहत नाही. तसेच, लघवी जास्त काळ रोखून धरू नका, यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते.

Urinary tract infection prevention

|

Sakal

आहारात करा 'हे' बदल

आहारात दही आणि ताकाचा समावेश करा.क्रॅनबेरी ज्यूस युटीआय रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.खूप तिखट आणि उष्ण पदार्थ खाणे टाळा.

Urinary tract infection prevention

|

sakal

डॉक्टरांचा सल्ला

जर लघवी करताना तीव्र जळजळ, वेदना किंवा ताप येत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा.

Urinary tract infection prevention

|

Sakal

मधुमेहापासून हृदयापर्यंत सर्व आजारांवर रामबाण आहे 'हा' काळा पदार्थ!

Superfood Black Rice for health

|

Sakal

येथे क्लिक करा