Saisimran Ghashi
अहमदाबादमध्ये झालेल्या प्लेन क्रॅशमध्ये 241 लोकांचा मृत्यू झाला आणि 1 व्यक्ति बचावली
या अपघाताचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला
पण हा व्हिडिओ शूट करणारा कोणी पत्रकार किंवा कॅमेरामन नाही
तर हा 17 वर्षांचा मुलगा आर्यन असारी आहे
विमानाच्या कुतुहलापायी त्याने व्हिडिओ शूट केला पण काही सेकंदात स्फोट झाला
या घटनेनंतर शनिवारी मेघानीनगर पोलिस आर्यनला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी घेऊन गेले
या मुलाला अटक झाल्याची खोट्या अफवा पसरवल्या जात होत्या, पण त्या खोट्या आहेत
तसेच पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की व्हिडिओ बनवल्या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही
आर्यन घटनेचा प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याची चौकशी करून त्याला घरी पाठवण्यात आले