Sandip Kapde
महाराष्ट्रात सध्या ‘भाग्यश्री’ नावाचं हॉटेल विशेष चर्चेत आलं आहे.
हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं आधी ‘साई व्हेज’ नावाचं शाकाहारी हॉटेल होतं.
कुटुंबाच्या आग्रहामुळे नागेश मडके यांनी मांसाहारी हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्यांदा ढवारा मटणापासून मांसाहारी हॉटेलची सुरुवात करण्यात आली.
घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळे मडके यांना व्यवसायात यश मिळालं.
संपूर्ण कुटुंबच हॉटेलमध्ये एकत्र काम करतं, ही त्यांची खरी ताकद आहे.
‘भाग्यश्री’ हे नाव त्यांच्या चार वर्षांच्या मुलीवरून ठेवण्यात आलं आहे.
नागेश मडके म्हणतात, “मुलगी हीच घरातील सर्वात मोठी लक्ष्मी असते.”
ते म्हणाले मला मागे वळण्याचा प्रयत्न केला, पण खचणार नाही; महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे.
आई-वडीलांना काहीतरी करून दाखवायचं हेच माझं मुख्य ध्येय आहे.
शिक्षण नसतानाही, नवरा-बायको मिळून हॉटेलचं संपूर्ण व्यवस्थापन पाहतात.