कावळ्याचं पिल्लू कधी दिसत का नाही? कारण काय?

Apurva Kulkarni

कावळ्याचं पिल्लू

आपल्याला आजुबाजुला नेहमीच कावळे दिसत असातत. परंतु आजपर्यंत सहसा कावळ्याचं पिल्लू दिसत नाही. यामागे नक्की कारण काय आहे जाणून घेऊया...

WHY BABY CROWS ARE NOT SEEN

|

esakal

उंचीवर घरटं

कावळ्यांचं घरटं नेहमीच मानवी वस्तीच्या खूप उंचावर असतं. जसं की मोठ्या झाडांच्या शेंड्यावर किंवा विजेच्या खांबावर असतं. त्यामुळे पिल्लू सहसा दिसत नाही.

WHY CROW CHICKS ARE RARELY VISIBLE

|

esakal

पिल्लांचा वाढण्याचा वेग

इतर पक्षांच्या पिल्लापेक्षा कावळ्याच्या पिल्लांची वाढ वेगानं होते. अंडी उबवल्यानंतर वेगळं ३० ते ४० दिवसात पिल्लू उडायला लागतं

CROW BREEDING

|

esakal

कावळे पिल्लांबाबत आक्रमक

कावळे हे त्यांच्या पिल्लांबाबत अत्यंत आक्रमक असतात. नेहमी सतर्क राहून ते ते पिल्लू उडेपर्यंत त्याची काळजी घेतात. तोपर्यंत ते घरटं सोडत नाही.

CROW CHICKS FACTS,

|

esakal

रंग आणि आकार

जेव्हा पिल्लू घरट्याबाहेरपडलं त्यावेळी आकाराने ते पुर्ण कावळ्यासारखं दिसतं. त्यामुळे बऱ्याच वेळा लहान पिल्लू न समजता आपण मोठा कावळा समजतो.

CROW PARENTING

|

esakal

सुरक्षित

एकूणच काय तर पिल्ले घरट्यात सुरक्षित असतात. जेव्हा ते बाहेर येतात, तेव्हा त्यांची वाढ कावळ्यांसारखी झालेली असते.

, INTERESTING CROW FACTS,

|

esakal

पिल्लांचं वजन

कावळ्याच्या पिल्लांचे वजन सुमारे ३० ग्रॅम असते. अनेक पिल्ले जन्मतःच पिसे नसलेली असतात.

CROW CHICK PROTECTION

|

esakal

नर-मादी कावळ्यात काय फरक असतो? कसा ओळखायचा?

CROW IDENTIFICATION

|

esakal

हे ही पहा...