सकाळ डिजिटल टीम
मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात या मागची कारणं काय आहेत जाणून घ्या.
Black Clothes Sankranti
sakal
विज्ञानानुसार, काळा रंग उष्णता शोषून घेणारा (Good absorber of heat) सर्वात प्रभावशाली रंग आहे. इतर रंगांच्या तुलनेत काळा रंग बाहेरील उष्णता स्वतःमध्ये सामावून घेतो.
Black Clothes Sankranti
sakal
मकर संक्रांत साधारणपणे १४ किंवा १५ जानेवारीला येते. हा काळ उत्तर गोलार्धात कडाक्याच्या थंडीचा असतो. शरीराला उबदार ठेवण्यासाठी या दिवशी काळे कपडे घालणे फायदेशीर मानले जाते.
Black Clothes Sankranti
sakal
काळे कपडे वातावरणातील उष्णता शोषतात आणि शरीराची नैसर्गिक उष्णता बाहेर पडू देत नाहीत, ज्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
Black Clothes Sankranti
sakal
या दिवसापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दिवसाचा कालावधी हळूहळू वाढू लागतो. सूर्याच्या या नवीन प्रवासाचे स्वागत करताना शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काळ्या रंगाची मदत होते.
Black Clothes Sankranti
sakal
थंडीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी शरीराला उष्णतेची गरज असते. काळे कपडे नैसर्गिकरित्या ही उष्णता पुरवण्याचे काम करतात, जे आरोग्यासाठी पूरक ठरू शकते.
Black Clothes Sankranti
sakal
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेमुळे मकर संक्रांतीला काळी साडी (स्त्रियांसाठी) आणि काळे सदरे (पुरुषांसाठी) घालणे हे एक सांस्कृतिक वैशिष्ट्य बनले आहे.
Black Clothes Sankranti
sakal
हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग अशुभ मानला जातो. परंतु, मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी काळा रंग केवळ मान्यच नाही तर अत्यंत शुभ मानला जातो.
Black Clothes Sankranti
sakal
लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला 'हलव्याचे दागिने' आणि काळे वस्त्र परिधान करून सण साजरा करण्याची महाराष्ट्रात विशेष पद्धत आहे, ज्याला 'कौतुक' म्हणून पाहिले जाते.
Black Clothes Sankranti
sakal