सकाळ डिजिटल टीम
माणसाच्या तोंडाच्या अगदी मागच्या बाजूला सर्वांत शेवटी येणाऱ्या दाढेला वैद्यकीय भाषेत 'थर्ड मोलर' किंवा अक्कलदाढ म्हणतात.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
बाकीचे दात लहानपणीच/लवकर येतात, पण अक्कलदाढेसाठी जबड्याची हाडे पूर्ण विकसित व्हावी लागतात.वयाच्या १७ ते २५ दरम्यान जबड्याचा विकास झाल्यावरच या दाढेसाठी तोंडात जागा तयार होते.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
वयाच्या १७ ते २५ वर्षांच्या दरम्यान ही दाढ येत असल्याने मानवी समजाच्या संदर्भावरून याला 'अक्कलदाढ' किंवा 'विज्डम टूथ' म्हटले जाते.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
आपल्या पूर्वजांच्या काळातील कडक मांस आणि सुकामेवा चावण्यासाठी अक्कलदाढेची गरज होती, पण शिजवलेल्या अन्नामुळे आज ही गरज संपली आहे.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
आजच्या काळात मानवी जबड्याचा आकार लहान झाल्यामुळे बहुतांश वैद्यकीय तज्ज्ञ अक्कलदाढेला शरीरातील एक 'वेस्टिजिअल ऑर्गन' (निष्क्रिय अवयव) मानतात.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
तोंडात पुरेशी जागा नसल्यामुळे ही दाढ तिरपी येते किंवा हिरडी अन् हाडात अडकते, ज्याला 'इम्पॅक्टेड विज्डम टूथ' म्हणतात.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
अर्धवट बाहेर आलेल्या दाढेभोवती अन्नकण साचून जिवाणूंची वाढ होते, ज्यामुळे हिरड्यांना सूज अन् वेदना देणारा 'पेरिकोरोनायटिस' हा संसर्ग होतो.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
अडकलेली अक्कलदाढ शेजारच्या चांगल्या दातांवर दाब निर्माण करते, ज्यामुळे इतर दात किडण्याचा किंवा खराब होण्याचा धोका वाढतो.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
दाढेभोवतीची स्वच्छता ठेवणे कठीण असल्याने त्या भागात द्रव साचून सिस्ट किंवा पू (ॲब्सेस) तयार होऊन तोंड उघडणेही कठीण होऊ शकते.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
जर अक्कलदाढ योग्य जागेवर आली असेल आणि कोणतीही समस्या नसेल, तर ती न काढता फक्त नियमित दात तपासणी पुरेशी ठरते.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
वारंवार होणारा संसर्ग, तीव्र वेदना किंवा इतर दातांना त्रास होत असल्यास डॉक्टर भूल (Local Anesthesia) देऊन ही दाढ सुरक्षितपणे काढून टाकतात.
Why Wisdom Teeth Appear Late
sakal
कोथिंबिरीचे पाणी केसांना लावल्याने केस लांब होतात का?
Coriander Water for Hair Growth
sakal