Anushka Tapshalkar
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे सोयीस्कर वाटू शकते, पण यामुळे दरवर्षी हजारो मायक्रोप्लास्टिक कण शरीरात जातात आणि दीर्घकालीन आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Danger Health Risks of Drinking Water from Plastic Bottle
sakal
दररोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणाऱ्या लोकांच्या शरीरात टॅप वॉटर पिणाऱ्यांपेक्षा दरवर्षी सुमारे ९०,००० अधिक मायक्रोप्लास्टिक कण जातात, असे अभ्यासात आढळले आहे.
Microplastics Consumption
sakal
प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण म्हणजे मायक्रोप्लास्टिक. हे डोळ्यांना न दिसणारे असून १ मायक्रॉनपासून ५ मिमीपर्यंत असू शकतात. त्याहूनही लहान कणांना नॅनोप्लास्टिक म्हणतात.
What Are Microplastics
sakal
निर्मिती, साठवण, वाहतूक आणि सूर्यप्रकाशात ठेवल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून हे कण पाण्यात मिसळतात. उष्णता आणि तापमानातील बदल यामुळे हा धोका वाढतो.
Risks at Every Step of Process
sakal
मायक्रोप्लास्टिक रक्तप्रवाहात जाऊन महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकतात. हार्मोन्स बिघडणे, सूज, न्यूरोलॉजिकल नुकसान, प्रजनन समस्या आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
Severe Health Impact
sakal
मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचे दीर्घकालीन दुष्परिणाम पूर्णपणे समजलेले नाहीत, कारण त्यांचे मोजमाप व शोध घेण्यासाठी प्रमाणित आणि परवडणाऱ्या पद्धती कमी आहेत.
Severe Impacts Still Unclear
sakal
काही तंत्रज्ञान कण शोधू शकते पण त्यांच्या रासायनिक संरचनेची माहिती देऊ शकत नाही, तर काही पद्धती संरचना ओळखतात पण सूक्ष्म कण ओळखण्यात अपयशी ठरतात. उपकरणे महागडी आहेत आणि त्यांची उपलब्धता मर्यादित आहे.
Analysis is Difficult
sakal
तज्ज्ञांचा सल्ला—प्लास्टिकच्या बाटल्या फक्त तातडीच्या परिस्थितीतच वापरा. रोजच्या वापरापासून दूर राहा. सुरक्षित पाणीपुरवठा, स्टील किंवा काचच्या बाटल्यांचा वापर आणि जनजागृती हाच योग्य उपाय आहे.
Solution
sakal
How to eat rice without feeling sleepy after lunch
sakal