सकाळ डिजिटल टीम
आंब्याखालोखाल उन्हाळ्यातील एक अत्यंत महत्त्वाचं फळ म्हणजे फणस. भारतभर विविध ठिकाणी फणस आढळतो.
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये गोवा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं.
फणस हे जगातील सर्वांत मोठ्या फळांपैकी एक आहे. एका फळाचं वजन पाच किलो ते २० किलोपर्यंत असू शकतं.
हेमंत ऋतूमध्ये फणसाच्या झाडाला फुलं येतात, आणि ग्रीष्म ऋतूच्या शेवटी फणसाचे फळ येतात.
फणसाच्या गर, बिया आणि तंतुमय भाग खाल्ले जातात. बिया भाजून, उकडून किंवा भाजी करून खाल्ल्या जातात.
फणसाच्या साली गुरांना खायला दिल्या जातात. यामुळे गुरांमध्ये दुधाचं प्रमाण वाढतं.
पिकलेला फणस शीत, स्निग्ध, पित्त-वातनाशक, तृप्तीदायक आणि मांसवृद्धीकर असतो. तसेच रक्तपित्त आणि व्रणनाशक आहे.
फणस वात-पित्त-कफनाशक असलं तरी, ज्याची भूक कमी आहे, अशांनी फणस खाणे टाळावं.