सकाळ डिजिटल टीम
अक्रोड सुक्या मेव्यातलं एक पौष्टिक आणि शक्तिवर्धक पदार्थ आहे. हे खाल्ल्याने शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते.
अक्रोड शरीराला शक्ती देत असतानाच वजन कमी करण्यास मदत करतो.
वजन कमी करण्यासाठी अक्रोड योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात खावे लागते.
अक्रोडमध्ये कॅलोरीज जास्त असतात – 30 ग्रॅम अक्रोडमध्ये 185 कॅलोरीज असतात.
दिवसाला फक्त 30 ग्रॅम अक्रोडच खाणं योग्य असतं, जास्त खाल्ले तर वजन वाढू शकते.
दिवसा भूक लागल्यास मूठभर अक्रोड खाल्ल्याने पोट लांब काळ भरलेलं राहू शकतं.
अक्रोडचं स्मूदी वजन कमी करण्यास मदत करू शकतं. यामुळे पचनक्रिया मंदावते.
अक्रोडाचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे सेवन योग्य प्रमाणातच करावे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन, उष्णतेचा , अपचन हे त्रास होतील.